५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील चि. कार्तिकी माहुलकर (वय ४ वर्षे) !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. कार्तिकी माहुलकर ही एक आहे !

नागपूर येथील सनातनची बालसाधिका चि. कार्तिकी माहुलकर हिचा कार्तिक कृष्ण पक्ष द्वितिया (९.११.२०१८) या दिवशी तिथीनुसार चौथा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

चि. कार्तिकी माहुलकर

चि. कार्तिकी माहुलकर हिला सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

‘चि. कार्तिकीचे वडील (श्री. पंकज) आणि आई (सौ. पल्लवी) दोघेही प्रत्येक शनिवारी टेकडी येथे गणपतीच्या दर्शनाला जात होते. सौ. पल्लवी प्रतिदिन देवपूजा करणे, गणपती स्तोत्र, महालक्ष्मी स्तोत्र आणि सरस्वती स्तोत्र यांचे वाचन करायची. ती प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी आरतीही करायची.

२. जन्मानंतर

४ मास ते १ वर्ष तिला बाळगुटी (बाळाला सहाणेवर ठराविक मात्रेत विविध काष्टौषधी उगाळून देणे) पाजतांना सर्व देवतांची नावे घेऊन गुटी पाजायचो. कार्तिकी झोपतांना प्रतिदिन ‘छोटी छोटी गय्या, छोटे छोटे ग्वाल’ हे भक्तीगीत ऐकूनच झोपायची. तिने कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही.’

– सौ. शोभा माहुलकर (आजी)

३. वर्ष १ ते २

‘ती प्रतिदिन माझ्यासमवेत देवळात यायची. प्रत्येक मूर्तीच्या पुढे डोके टेकवून नमस्कार करणे, विभूती लावणे, आरती घेणे, प्रसाद घेणे, हे सर्व करायला तिला आवडायचे.’ – श्री. विनोद माहुलकर (आजोबा)

४. वर्ष २ ते ३

‘तिला आरतीचे ताम्हण धरायला आणि घंटा वाजवायला आवडतेे. तिला आरतीचे पुस्तक हातात धरून आरती म्हणायला आवडते. तिच्या हातात इतर पुस्तक दिले, तर ती ते ठेवून देते. मी चंडीकवच म्हणतांना माझ्या हातातील पुस्तक जिद्दीने घेऊन तोंडाने पुटपुटत रहाते.’ – सौ. शोभा माहुलकर (आजी)

५. वर्ष ४

५ अ. प्रेमळ : ‘तिला सर्वांविषयी पुष्कळ प्रेम आहे. ती मला औषधाची गोळी वेळेवर देते.

५ आ. जिज्ञासू : प्रश्‍न विचारणे, हे तिचे वैशिष्ट्य आहे.

‘परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या जीवन दर्शनभाग-१’ या ग्रंथाचे ती फार निरीक्षण करते आणि त्यातील छायाचित्रे पाहून अनेक प्रश्‍न विचारते, उदा. ‘प.पू. (परात्पर गुरुदेव) दोरी पकडून का चढत आहेत ?’

५ इ. नियमितपणा : शाळेतून आल्यावर ती लगेच गृहपाठ करते.’

– सौ. शोभा माहुलकर (आजी)

५ ई. हुशार : ‘शाळेत पालकसभेला गेल्यावर तिच्या शिक्षिका आम्हाला म्हणाल्या, ‘‘हिला इतर मुलांसारखे काही शिकवावे लागत नाही. तिला सर्व येते.’ – श्री. पंकज आणि सौ. पल्लवी माहुलकर (आई-वडील)

५ उ. कलेची आवड : ‘तिला चित्र काढायला आणि नृत्य करायला आवडते.

५ ऊ. उत्तम निरीक्षणक्षमता 

१. शाळेतून आल्यावर खडू घेऊन ती घरातील फळ्यावर तिची शिक्षिका जशी शिकवते, तशी मुलांना शिकवते.

२. ती माझे पाहून अत्तर आणि कापूर यांचे उपायही करते.

३. तिची निरीक्षणक्षमता उत्तम आहे. तिच्या चांगले लक्षात रहाते.

५ ए. सात्त्विकतेची आवड : तिला तांब्या-पितळ्याची भांडी फार आवडतात. ती भांडी घेऊन दिवसभर खेळत असते.

५ ऐ. देवाची आवड : तिला ‘शुभं करोति, सदासर्वदा योग तुझा घडावा, वक्रतुंड महाकाय, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, कृष्णाय वासुदेवाय’, हे सर्व श्‍लोक पाठ आहेत आणि ती ते नियमित म्हणते.’

– सौ. शोभा माहुलकर (आजी)

५ ओ. धर्माचरण करणे : ती घरी आलेल्या स्त्रियांना हळद-कुंकू लावून त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करते. ती स्वतःलासुद्धा हळद-कुंकू लावते.

– सौ. पल्लवी माहुलकर (आई)

५ औ. परात्पर गुरुदेवांविषयी असलेला भाव

१. ती परात्पर गुरुदेवांना ताट उचलून ‘बाबा, जेवायला या’, ‘प.पू. बाबा, बॉल खेळायला या’, असे म्हणते. (ती परात्पर गुरुदेवांना ‘बाबा’ म्हणते.)

२. ‘तुला कोण व्हायचे आहे ?’ असे विचारल्यावर ‘मला बाबांसारखे (प.पू. गुरुदेवांसारखे) व्हायचे आहे’, असे म्हणते.

३. ‘पणजोबा दूर गेले’, असे सांगितले, तर ती म्हणते, ‘‘ते प.पू. बाबांजवळ गेले आहेत’’ (माझे वडील आणि सासरे यांचा मृत्यू झाला आहे.)

४. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला हात लावून तो हात प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवते.

६. स्वभावदोष

हट्टीपणा, कंटाळा आणि झोपेतून उठण्याचा आळस

७. आजीने व्यक्त केलेली कृतज्ञता

अशी गुणी नात दिल्याबद्दल आणि तिच्याविषयीचे हे लिखाण परात्पर गुरुदेवांनी करून घेतल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’

– सौ. शोभा माहुलकर (आजी)

८. केंद्रातील साधिकेला जाणवलेले कु. कार्तिकीचे वैशिष्ट्य

‘कधी कधी कार्तिकी आजोबांसमवेत आजीला सत्संगाला सोडायला येते. तेव्हा आजीला सोडल्यानंतर आजोबा तिला घरी घेऊन जात असतांना ती म्हणते, ‘‘आपण इथेच थांबूया.’’ ती कधी थांबली, तर सत्संग संपेपर्यंत अगदी शांत बसून रहाते. जराही कंटाळा करीत नाही. तिच्या वागणुकीतून ‘तिला त्या सत्संगाचे गांभीर्य वाटत आहे’, असे जाणवते.’ – सौ. नम्रता शास्त्री, नागपूर

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

 

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now