दिवाळीनिमित्त नियंत्रणरेषेवर भारत-पाक सैन्याने एकमेकांना मिठाई वाटली !

  • शत्रू प्रतिदिन आक्रमण करत असतांना त्याला मिठाई वाटण्याची आत्मघातकी गांधीगिरी केंद्रातील भाजप सरकारकडून अपेक्षित नाही !
  • रमझानच्या काळात भारत सरकार काश्मीरमध्ये शस्त्रबंदी करते; मात्र दिवाळीच्या काळात पाक कधी शस्त्रबंदी करत नाही, हे लक्षात घ्या !

जम्मू-काश्मीर – पुंछ जिल्हा मुख्यालयापासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या नियंत्रणरेषेवरील चक्का दा बाग येथील ‘राह-ए-मिलन’चे फाटक ६ नोव्हेंबरला दुपारी भारतीय सेनेच्या आग्रहास्तव उघडण्यात आले. तेथे भारत आणि पाकचे सैन्याधिकारी अन् सैनिक यांनी हस्तांदोलन केले. त्यांनतर भारताच्या वतीने पाक सैन्याधिकार्‍यांना दिवाळीनिमित्त मिठाई दिली. यावर पाकच्या अधिकार्‍यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याच वेळी मेंढरमधील नियंत्रणरेषेवरील फाटकही उघडण्यात आले होते. तेथेही दिवाळीनिमित्त भारत-पाक सैनिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत नियंत्रणरेषेवर शांती आणि सौहार्द टिकून ठेवण्याविषयी चर्चा केली. १५ मिनिटांच्या या भेटीनंतर फाटक पुन्हा लावण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF