वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात देहली येथे मंत्रालयाच्या बाहेर निदर्शने

  • आता शुद्ध हवेसाठीही जनतेला आंदोलन करावे लागणे, हा विज्ञानाचा दारूण पराभव होय !
  • कुठे केवळ १०० वर्षांत पृथ्वीला विनाशाच्या खाईत लोटणारे आधुनिक विज्ञान, तर कुठे सहस्रो वर्षांपासून पृथ्वी प्रदूषणमुक्त ठेवणारी प्राचीन भारतीय संस्कृती !

देहली – राजधानी देहली येथे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबर या दिवशी इंदिरा पर्यावरण भवनच्या बाहेर काही लोकांनी याच्या विरोधात निदर्शन केले. लोकांनी या वेळी ‘श्‍वास घेणे हा माझा अधिकार आहे’, असा मजकूर असलेले फलक हातात घेतले होते. (श्‍वास घेणे हा जसा नागरिकांचा अधिकार आहे, तसे श्‍वास घेण्यासाठी पूरक अशा पर्यावरणाचे रक्षण करणे, हेही नागरिकांचे कर्तव्यच आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF