लाच घेतांना देहलीच्या वस्तू आणि सेवा कर साहाय्यक आयुक्तांना अटक

  • भ्रष्टाचार होत नाही, असे देशात एकतरी क्षेत्र आहे का ?
  • सरकारमधील लाचखोर उच्चपदस्थ अधिकार्‍यांना केवळ अटक नव्हे, तर तात्काळ निलंबित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करा !
  • असे खंडणीखोर सरकारी अधिकारी असतील, तर करव्यवस्थेमध्ये कितीही सुधारणा केल्या, तरी देशाचा महसूल वाढेल का ?

देहली – केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी कारवाई करत देहलीचे वस्तू आणि सेवा कराचे (जीएस्टीचे) साहाय्यक आयुक्त जितेंद्र जून यांना दिनेश खुराना यांच्याकडून ६ लाख रुपये लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. जीएस्टी विभागाने करोल बाग या परिसरातील एका खासगी आस्थापनावर छापा घातला होता. त्याच आस्थापनकडून जितेंद्र जून यांना खुराना यांच्या साहाय्याने लाभ मिळत होता. या प्रकरणाला अनुसरून देहलीमध्ये विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यांमध्ये २२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF