अमेरिकी निर्बंध तोडून तेलविक्री करणार ! – इराणचे राष्ट्रपती रूहानी

इराणवर अमेरिकेचे निर्बंध लागू, तर भारताला सवलत

वॉशिंग्टन – अमेरिकेने ५ नोव्हेंबरपासून इराणवर अत्यंत कठोर प्रतिबंध लादले आहेत. इराणमधील बँकिंग आणि तेल क्षेत्रांतही हे निर्बंध लागू होणार आहेत. इराणकडून तेल आयात बंद न करणार्‍या देशांना अमेरिकेकडून दंडही लावला जाण्याची शक्यता आहे. इराणचा क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी अन् मध्य पूर्वेत असलेला इराणचा प्रभाव नष्ट करण्यासाठी अमेरिकेने ही पावले उचलली आहेत. या घडामोडींचा जागतिक तेल बाजारावर मोठा परिणाम होणार आहे. अमेरिकेने भारतासह अन्य ८ देशांना या निर्बंधांमधून सवलत दिली आहे.

इराणने या प्रतिबंधांना ‘आर्थिक युद्ध’ असे संबोधले आहे. ‘इराण अभिमानाने या नियमांचे उल्लंघन करून तेल निर्यात चालूच ठेवणार आहे; कारण अमेरिकेचे असे वागणे, हे आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात आहे’, असे इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now