फैजाबादचे ‘अयोध्या’ असे नामकरण करणार ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

अयोध्येत भव्य ‘दीपोत्सव २०१८’ कार्यक्रम

राममंदिराविषयी मौनच : आकर्षक घोषणा करून रामभक्तांची भलावण

अयोध्या – जगातील कोणतीही शक्ती अयोध्येवर अन्याय करू शकत नाही.  अयोध्या ही रामाची ओळख आहे. मी अयोध्यावासियांसह देशभरातील रामभक्तांच्या भावनांशी जोडला जाऊ इच्छितो. त्यामुळे दीपावलीच्या मुहुर्तावर फैजाबाद जिल्ह्याचे ‘अयोध्या’ असे नामकरण करण्यात येईल, अशी घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत दीपावलीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘दीपोत्सव २०१८’ कार्यक्रमात केली. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींची पत्नी किम जोंग सूक या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या. या दीपोत्सव कार्यक्रमात ‘योगी आदित्यनाथ राममंदिराच्या उभारणीची घोषणा करणार का’, याकडे देशभरातील साधू-संतांचे लक्ष लागले होते.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींची पत्नी किम जोंग सूक

मुख्यमंत्र्यांनी याही वेळी राममंदिराच्या सूत्राला बगल दिली आहे. राममंदिराच्या निर्मितीची भलावण अयोध्येच्या नामांतरावर करून सरकारने पुन्हा एकदा रामभक्तांची घोर निराशा केली आहे.

सध्या देशभर राममंदिरावरून भाजपविषयी असंतोष निर्माण होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत राजा दशरथाच्या नावे नवीन वैद्यकीय महाविद्यालय चालू करणे, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामाच्या नावे विमानतळ उभारणे आदी आकर्षक घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘‘रावणाचा वध केल्यानंतरही तेथील सत्ता त्याचा भाऊ बिभिषणाकडे देऊन प्रभु श्रीराम अयोध्येला परतले. अयोध्येची भूमी शांती आणि सौहार्दाची आहे. तोच संदेश ती देशभर देईल. ‘कोणत्याही प्रकारचे दुःख, अन्याय नसेल अशा रामराज्याची निर्मिती आपल्याला करायची आहे. रामराज्य तेच असेल जेथे अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक स्तरावर शांती असेल. त्या राज्यात जात, धर्म, संप्रदाय असा भेद असणार नाही.’’

कार्यक्रमाच्या निमित्ताने अयोध्येत ३ लाख दिव्यांनी रोषणाई करण्यात आली होती. विविध पारंपरिक वाद्ये, देखावे यांच्या आधारे त्रेतायुगात प्रभु श्रीराम अयोध्येत परतले, तेव्हा जसे वातावरण होते, तसे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

१ जानेवारीपासून राममंदिराच्या उभारणीला आरंभ न झाल्यास देहत्याग करणार ! – भारतमाता मंदिराचे अध्यक्ष स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांची चेतावणी

संतांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे भाजप आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना अत्यंत लज्जास्पद ! देहत्याग करून सरकारवर काडीचाही परिणाम होणार नाही, हे आजवरच्या घटनांवरून स्पष्ट होते. यास्तव संतांच्या मार्गदर्शनाखाली राज्य करणार्‍यांच्या हाती राज्यकारभार सोपवणे म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच सर्व समस्यांवरील अंतिम उपाय आहे !

स्वामी स्वामी सत्यमित्रानंद गिरिजी

हरिद्वार – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन रामभक्तांना नुकतेच दिले होते; मात्र तरीही राममंदिर उभारणीच्या संदर्भात सरकारने गांभीर्याने पावले उचलल्याचे न दिसल्याने येथील प्रसिद्ध संत आणि भारतमाता मंदिराचे अध्यक्ष स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी राममंदिरासाठी ६ डिसेंबरपासून हरिद्वार येथे उपोषण करणार असल्याचे सांगितले. देशातील सर्व संतांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

‘सरकारने जर पुढीलवर्षी १ जानेवारीपासून मंदिर उभारणीच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलले नाही, तर मी देहत्याग करीन’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. हरिद्वार येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सरकारच्या भवितव्याची  चिंता न करता राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करावा’, असे आवाहन केले आहे. (अयोध्येमध्ये राममंदिर उभारण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी आंदोलने केली आहेत. धर्माचार्य, संत, महंत यांनीही यासंदर्भात सरकारला धर्मादेश दिला आहे, असे असूनही भाजप सरकारने राममंदिराचा विषय गांभीर्याने घेतलेला दिसून येत नाही. त्यामुळेच संतांना पुन:पुन्हा आंदोलनाची चेतावणी द्यावी लागते ! – संपादक)

स्वामी सत्यमित्रानंद गिरी म्हणाले की,

१. मोदींनी सरकारची पर्वा करू नये; कारण राम असेल, तरच राज्य आणि सरकार आहे. (धर्मो रक्षति रक्षित: । (अर्थ : जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म म्हणजे ईश्‍वर रक्षण करतो.) हे सरकारला कळेल, तो सुदिन ! – संपादक) केंद्र सरकारने लाभ-हानीचा कोणताही विचार करू नये. पंतप्रधान मोदींच्या शासनकाळातच मंदिराची उभारणी झाली पाहिजेे. अयोध्येमध्ये राममंदिर स्थापन होण्यासाठी आता संत आणखी वाट पाहू शकत नाहीत. सरकारने यासाठी आणखी विलंब करू नये.

२. या संदर्भात शांततेने मार्ग निघावा, यासाठी आम्ही प्रयत्न केला. व्ही.पी. सिंह सरकारच्या काळात शांततापूर्ण मार्ग काढण्यात आला होता. संतांना आजही शांतता हवी आहे. शांततेतूनच राममंदिराची स्थापना झाली पाहिजे. यासाठी सरकारने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.


Multi Language |Offline reading | PDF