जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवाद्यांचा खात्मा

आतंकवादग्रस्त भारत ! असे १-२ आतंकवादी मारत बसण्यापेक्षा आतंकवादाचे मूळ असलेल्या पाकलाच नष्ट केल्यास ही समस्या कायमचीच सुटेल, हे न कळणारे शासनकर्ते आतंकवाद कधीतरी संपुष्टात आणतील का ? आतंकवादासह सर्व समस्या सुटण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियांमधील साफनगरी येथे सुरक्षादलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. महंमद इद्रीस सुल्तान आणि आमिर हुसैन रैदर अशी मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत. हे दोन्ही आतंकवादी हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले. शोपियां जिल्ह्यातील साफनगरी येथे काही आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाच्या सैनिकांनी या परिसराला वेढा घातला आणि दोन आतंकवाद्यांना ठार केले. या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF