शबरीमला मंदिरात निषिद्ध वयोगटातील महिला स्वतःहूनच दर्शनासाठी आल्या नाहीत !

यावरून न्यायालयाच्या आदेशानंतरही लाखो महिलांचा हिंदूंच्या धर्मपरंपरा पाळण्याकडेच कल आहे, हे स्पष्ट होते !

थिरूवनंतरपूरम् – शबरीमला मंदिरात निषिद्ध वयोगटातील महिला स्वतःहूनच श्री अय्यप्पास्वामींच्या दर्शनाला आल्या नाहीत. त्यामुळे भाविकांचे आंदोलन शांततेत पार पडले. मंदिर उघडण्याच्या आधीपासूनच सहस्रो भाविक आंदोलनासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. एका वृत्तपत्राचा छायाचित्रकार किरकोळ घायाळ झाल्याची घटना वगळता हे आंदोलन शांततेत पार पडले. (प्रसारमाध्यमे ही बातमी कदापि दाखवणार नाहीत ! आंदोलनाच्या वेळी हिंसाचार झाला असता, तर एव्हाना माध्यमांनी हिंदूंना खलनायक ठरवले असते ! माध्यमे इतका हिंदुद्वेष का जोपासतात ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF