सर्वोच्च न्यायालयाच्या फटाकेविषयक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात ध्वनीप्रदूषण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद होणार ! – मुंबई पोलीस

ध्वनी आणि वायू प्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर कायमचीच बंदीघातल्यास सर्व समस्या सुटतील, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ?

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची अनुमती आहे. या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. याचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध ध्वनीप्रदूषण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद होणार आहे, तसेच ८ दिवसांचा कारावास आणि दंडही भरावा लागणार आहे. स्थानिक पोलीस ठाणे परिमंडळाच्या अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पहारा वाढवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांत पाठवण्यात आली आहे, तसेच त्याविषयी ठोस पावले उचलण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. संकुले, चाळी, महत्त्वाची ठिकाणे येथे जाऊन पोलिसांकडून नियमाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF