ओडिशात चकमकीत ५ नक्षलवादी ठार

नक्षलग्रस्त भारत !

  • ७१ वर्षांत कुठल्याही सरकारला नक्षलवादाचा बीमोड करता न येणे लज्जास्पद !
  • नक्षलप्रेमींना अटक केल्यावर गळे काढणारे पुरो(अधो)गामी, डावे, साम्यवादी, काँग्रेस आदींनी या नक्षलवादी कारवाईच्या विरोधात ओरड केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

भुवनेश्‍वर – येथील मलकानगिरी जिल्ह्यातील कालीमेला येथील पुलुरुस्थित वेंजिगवाडा जंगलात ५ नोव्हेंबर या दिवशी सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक महिला नक्षलवादी असल्याचेही सांगण्यात येत आहे. सुरक्षादलांना या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. तथापि हे सर्व जण कालीमेलादलम् या संघटनेचे सदस्य असल्याचे सांगण्यात आले. सैनिकांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रात्रे जप्त केली आहेत.

पोलीस महासंचालक आर्.पी. शर्मा म्हणाले, ‘‘वेंजिगवाडा जंगलात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला विश्‍वसनीय सूत्रांकडून ४ नोव्हेंबरला मिळाली. यानंतर ‘विशेष कृती दला’च्या २ तुकड्यांतील ६० सैनिकांद्वारे आम्ही कारवाईची दिशा निश्‍चित केली. नियोजनबद्ध कारवाई केल्यामुळे आम्हाला हे यश मिळाले. ओडिशातील गेल्या ३ वर्षांतील ही नक्षलवाद्यांच्या विरोधातील सर्वांत मोठी कारवाई आहे. माओवाद्यांना स्थानिक नागरिकांमध्ये भय निर्माण करायचे होते. ते आम्ही होऊ दिले नाही. अद्यापही या भागात शोधमोहीम चालू आहे. आम्ही नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाई अधिक तीव्र करू, तसेच ओडिशातून नक्षलवादाचा संपूर्ण बीमोड करू.’’


Multi Language |Offline reading | PDF