आंध्रप्रदेशमध्ये धर्मांधाकडून मंदिरातील पुजार्‍याची हत्या

  • मंदिरातील ध्वनीक्षेपकाचा त्रास होत असल्याचा कांगावा
  • मशिदींवरील भोंग्यांचा दिवसरात्र त्रास होऊनही हिंदू या भोंग्यांविरुद्ध न्यायालयीन मार्ग अवलंबतात, तर मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाचा कथित त्रास होतो; म्हणून धर्मांध हे हिंदूंची थेट हत्या करतात ! यावर आता पुरोगामी, प्रसारमाध्यमे काही बोलत का नाहीत ?

वारंगळ (आंध्रप्रदेश) – मंदिरातील ध्वनीक्षेपकाचा त्रास होतो; म्हणून येथील एका धर्मांधाने श्री साईबाबा मंदिरातील पुजारी सत्यनारायण शर्मा (वय ६८ वर्षे) यांची हत्या केली. सादिक हुसेन असे या धर्मांधाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

सादिक हुसेन हा येथील श्री साईबाबा मंदिराजवळ रहात होता. मंदिरावर आरतीसाठी लावलेल्या ध्वनीक्षेपकाच्या आवाजामुळे त्याच्या आईला त्रास होत असल्याचे कारण पुढे करत त्याने मंदिराचे पुजारी शर्मा यांच्याशी २६ ऑक्टोबर या दिवशी वाद घातला आणि नंतर त्यांच्यावर आक्रमण केले. या आक्रमणात शर्मा यांच्या वर्मी घाव बसल्याने प्रथम त्यांना स्थानिक रुग्णालयात आणि नंतर भाग्यनगर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. तथापि २ नोव्हेंबर या दिवशी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

विहिंप आणि भाजप यांनी ‘ही घटना म्हणजे हिंदु धर्मावरील आक्रमण आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.


Multi Language |Offline reading | PDF