दूधभेसळ विरोधी कायदा कडक होणार

इंग्रजांनी केलेले जुनाट कायदे म्हणजे भारतियांवर लादलेली गुलामगिरी नव्हे का ? गेल्या ७० वर्षांमध्ये साधे कायदेही पालटू न शकलेल्या लोकशाहीची निरर्थकता आणखी किती दिवस सहन करायची ?

मुंबई – दुधात भेसळ करण्याचे प्रमाण वाढत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने (एफ्डीए) दूधभेसळ विरोधी कायदा कडक करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. भेसळखोरांना जन्मठेपेपर्यंत शिक्षा करण्याची तरतूद करावी, असे या प्रस्तावात म्हटले आहे. महाराष्ट्रात या नव्या कायदादुरुस्तीनंतर अधिक कठोर शिक्षा करणे शक्य होणार आहे.

नुकतीच अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुधातील भेसळ रोेखण्यासाठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ९ लाख २२ सहस्र लिटर दुधाची तपासणी केल्यावर त्यापैकी साडेपाच लाख लिटरहून अधिक भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF