(म्हणे) ‘सत्तेत आल्यानंतर काँग्रेस संघावर काय कारवाई करणार, याचा सुस्पष्ट आराखडा मांडावा !’ – प्रकाश आंबेडकर

भारताला विविध समस्यांना प्रतिदिन तोंड द्यावे लागत आहे, तरीही केवळ जातीय आकसापोटी संघावर कारवाईची मागणी करणारे प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे नेते देश एकसंध काय ठेवणार ? असे नेते लोकशाही निरर्थक ठरवतात !

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससमवेत समझोता (युती) करण्यासाठी जागा वाटपाचे सूत्र महत्त्वाचे नाही, तर सत्तेत आल्यानंतर काँग्रेस ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’वर काय कारवाई करणार, याचा सुस्पष्ट आराखडा मांडावा, त्यानंतरच काँग्रेससह युती करण्याची भूमिका स्पष्ट केली जाईल, असा प्रस्ताव आपण काँग्रेसला दिला आहे. हा प्रस्ताव काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासमोर ठेवला जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. कदाचित त्यांनी राज्यातील नेत्यांना हिरवा कंदील दाखवला नसेल, अशी माहिती भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससमवेत युतीच्या संदर्भातील चर्चेविषयी दिली.

 


Multi Language |Offline reading | PDF