चारकोप (मुंबई) येथील खारफुटीक्षेत्रामध्ये वारंवार लागत असलेल्या आगीमुळे रहिवासी त्रस्त

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या खारफुटीक्षेत्राला वारंवार आग लागत असल्यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा नागरिकांना संशय येतो. हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणवादाचा ढोल बडवणारे अशा घटनांचा निषेध करण्यासाठी पुढे का येत नाहीत ?

मुंबई – कांदिवली (प.) येथील चारकोपच्या सेक्टर-२ मध्ये १ नोव्हेंबरला रात्री १० च्या वेळी खारफुटीमध्ये आग लागली होती. ती कचरा जाळण्यासाठी लावली ?, कि खारफुटी नष्ट करण्यासाठी लावली ?, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. ही आग अनुमाने ५० मीटर परिसरात पसरली होती. त्यामुळे या परिसरातील खारफुटीची मुळे, खोडे जळून नष्ट झाली आहेत. खारफुटीच्या परिसरात लोकांनी जाऊ नये; म्हणून २ मासांपूर्वी १० फुटांचे खड्डे करण्यात आले होते; मात्र या खड्ड्यांमध्येही कचरा आणि प्लास्टिक टाकून बुजवण्यात आल्याचे रहिवासी आणि मिशन ग्रीन मुंबईचे कार्यकर्ते शुभजीत मुखर्जी यांनी सांगितले.

या परिसरात वारंवार आगी लागत आहेत. कचरा आणि आग यांमुळे डास आणि प्रदूषण यांच्या त्रासाला स्थानिक रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. (रहिवाशांना होत असलेल्या त्रासाकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष का करत आहे ? – संपादक) खारफुटीच्या संरक्षित क्षेत्रामध्ये अशा प्रकारे वारंवार आग लागण्याच्या घटना घडूनही योग्य ती पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये अप्रसन्नता आहे. तारांचे कुंपण वाकवून, खड्ड्यांमध्ये भराव टाकून खारफुटी क्षेत्रामध्ये प्रवेश केला जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF