(म्हणे) ‘वर्ष २०१९ ची निवडणूक राज्यघटना विरुद्ध मनुस्मृति अशी असेल !’ – काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे

मुंबईतील ‘संविधान बचाव परिषदे’तील मुक्ताफळे !

राज्यघटना वाचवण्यासाठी विद्रोहाची वेळ आली ! – संजय निरुपम यांचे विखारी वक्तव्य

  • राज्यघटनेप्रमाणे न वागणार्‍या काँग्रेसमुळेच देशात हिंदुद्वेष आणि जातीद्वेष फोफावला. एकगठ्ठा मतांसाठी केवळ अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करून बहुसंख्य हिंदूंवर अत्याचार होऊ देणार्‍या काँग्रेसने राज्यघटना वाचवण्याच्या बाता मारणे म्हणजे निव्वळ धूळफेक आहे !
  • कधी नव्हे एवढी हिंदूऐक्याची आवश्यकता असतांना हिंदूंमध्ये फूट पाडणारी अशी विधाने करणार्‍या काँग्रेसमुळे देशातील वातावरण बिघडल्यास त्याचे दायित्व हिंदुद्वेषी काँग्रेसचेच असेल, हे मात्र निश्‍चित  

मुंबई – निवडणुका जवळ आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात, त्यांच्या पुतळ्यांना नमस्कार करतात; पण सत्तेत बसून बाबासाहेबांची राज्यघटना (संविधान) नष्ट करायचे उद्योग चालू आहेत. मनुस्मृतीचे रक्षण करायचे कि राज्यघटनेचे, याचा निर्णय वर्ष २०१९ च्या निवडणुकीने होणार आहे. ही निवडणूक ‘राज्यघटना विरुद्ध मनुस्मृति’, अशी असणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनुवादाचा पराभव करण्यासाठी सज्ज रहावे, असे हिंदुद्वेषी आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काँग्रेसने ‘संविधान बचाव परिषदे’चे आयोजन केले होते.

त्या वेळी ते बोलत होते. या परिषदेत देशाची राज्यघटना वाचवण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.

१. राज्यघटनेमुळे देशातील अस्पृश्यता संपली. भाजप सरकारच्या ४ वर्षांच्या काळात महिला, दलित आणि अल्पसंख्यांक यांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. काँग्रेसने कायम नागरिकांना मूलभूत अधिकार आणि व्यक्तीस्वातंत्र्य दिले. भाजपच्या काळात विकास तर झालाच नाही; पण हुकूमशाही पद्धतीने निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सी.बी.आय.) आणि संरक्षण खाते यांची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजप सरकारला हरवण्याचे उद्दिष्ट सर्वांनी डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे, असे खर्गे यांनी सांगितले.

२. काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले, ‘‘राज्यघटना हा भारताचा प्राण आहे आणि तीच सध्या अडचणीत आहे. ‘काय बोलायचे ?, ‘काय खायचे ?’, कोणते कपडे घालायचे?’, हे भाजप सरकार ठरवत आहे. देशाच्या नीतीमूल्यांवर प्रतिदिन आक्रमण होण्यासमवेत न्यायपालिका, विद्यापीठ, दलित समाज, अल्पसंख्यांक, व्यापारी वर्ग, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्यावरही आक्रमण होत आहे. (नीतीमूल्ये वारंवार पायदळी तुडवणार्‍या काँग्रेसने नीतीमूल्यांवर भाष्य करणे हास्यास्पद ! – संपादक) राज्यघटना वाचवण्यासाठी विद्रोहाची वेळ आली आहे. राज्यघटनेच्या सूत्रावरून दिवाळीनंतर काँग्रेस आक्रमक आंदोलन करणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF