भाभा अणुसंशोधन केंद्राची विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी ! – के. एन्. व्यास

मुंबई – गेल्या वर्षभरात भाभा अणुसंशोधन केंद्राने केवळ ऊर्जा क्षेत्रच नव्हे, तर आरोग्य, कृषी, खाद्यपदार्थ अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, असे आयोगाचे विद्यमान अध्यक्ष के. एन्. व्यास यांनी सांगितले. संस्थेचा ६४ वा वर्धापनदिन आणि डॉ. होमी भाभा यांची १०९वी जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्या वैद्यकीय संशोधनासाठी ध्रुव ही अणुभट्टी वापरण्यात येते; मात्र आता अप्सरा अणुभट्टीचाही या संशोधनासाठी वापर करण्यात येणार आहे. कर्करोगाच्या उपचारांसाठी अणुलहरींचा वापर प्रभावी ठरू शकतो. या दृष्टीने केंद्रात विविध स्तरावर संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाचा वापर करून देशातील २०० रुग्णालयांमध्ये उपचार चालू करण्यात आले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now