टोरॅन्टो येथील ‘जागतिक धर्मसंसदे’च्या उद्घाटन कार्यक्रमातून हिंदु धर्माच्या प्रतिनिधीला वगळले !

टोरॅन्टो येथील हिंदुत्वनिष्ठ डॉ. रागिणी शर्मा यांच्याकडून निषेध व्यक्त

  • हिंदूंच्या या अवमानाचा भाजप सरकार निषेध करणार कि नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करणार ?
  • हिंदु धर्मासाठी कृतीशील असलेल्या टोरॅन्टो येथील डॉ. रागिणी शर्मा यांचे अभिनंदन !

टोरॅन्टो – येथे आयोजित ‘जागतिक धर्मसंसदे’च्या उद्घाटन कार्यक्रमातून हिंदु धर्माच्या प्रतिनिधीला वगळल्याचा प्रकार उघड झाला आहे. स्वामी विवेकानंद यांनी‘जागतिक धर्मसंसदे’मध्येच अत्यंत प्रभावी भाषण करून हिंदु धर्माचे महत्त्व जगाला पटवून दिले होते. त्याला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त २०१८ मध्ये टोरॅन्टो येथे १ ते ७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ‘जागतिक धर्मसंसदे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात हिंदु धर्माच्या प्रतिनिधीला वगळण्यात आल्याचा निषेध अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला आहे. या प्रकरणी टोरॅन्टो येथील हिंदुत्वनिष्ठ डॉ. रागिणी शर्मा यांनी या धर्मसंसदेच्या आयोजकांकडे निषेध व्यक्त केला आहे. डॉ. रागिणी शर्मा यांनी स्वतः याविषयीची सर्व माहिती सामाजिक प्रसारमाध्यमांवर दिली आहे. डॉ. शर्मा म्हणाल्या, ‘‘या धर्मसंसदेच्या उद्घाटन सोहळ्यात सर्वधर्मीय प्रतिनिधींची भाषणे झाली. मी हिंदु प्रतिनिधींच्या भाषणाची वाट पहात रात्री १० वाजेपर्यंत थांबले होते; मात्र हिंदु प्रतिनिधीला निमंत्रित करण्यात आले नसल्याचे मला समजले.

यामुळे मी संसदेच्या आयोजकांकडे माझी अप्रसन्नता (नाराजी) व्यक्त केली. धर्मसंसदेच्या सह-आयोजक वीणा हॉवर्ड यांना विचारले, ‘‘जगात १०० कोटीहून अधिक हिंदू असतांना त्यांना निमंत्रित का केले नाही ?’’ यावर सारवासारव करत त्यांनी ‘आम्ही निमंत्रित केले होते; पण कुणी आले नाही’, असे उत्तर दिले. तेवढ्यात त्यांच्या समवेत असलेल्या सहकार्‍याने सांगितले की, ‘हिंदु धर्माचे प्रतिनिधी आले होते; मात्र ते व्यासपिठाच्या मागे बसले होते आणि ही गोष्ट मी वीणा हॉवर्ड यांच्या कानावर घातली नाही.’ त्यावर मी वीणा यांना विचारले की, त्यांनी तशी घोषणा करून उपस्थित हिंदूंना कल्पना का दिली नाही ? त्यावर त्या निरुत्तर झाल्या. या प्रसंगी मला येथे उपस्थित अनेक हिंदुत्वनिष्ठांनी पाठिंबा दिला. या जागतिक संसदेचे घोषणावाक्य ‘सर्वसमावेशक आणि प्रेमाची शक्ती’, असे होते; मात्र त्याचा संपूर्ण बोजवारा उडाल्याने धर्मसंसदेतून काहीच साध्य झाले नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF