साधकांनो, सनातनवर बंदी आणण्यासाठी सक्रीय असणार्‍या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांविषयी सतर्कता बाळगा !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

सनातन संस्थेवर बंदी यावी, यासाठी विविध अन्वेषण यंत्रणा, राजकीय नेते, सनातनद्वेष्टे आणि तथाकथित पुरोगामी आकाश-पाताळ एक करत आहेत. याचसमवेत सर्वत्रच्या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनाही सनातनवर बंदी आणण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे अनेक हिंदुत्वनिष्ठांकडून समजत आहे.

१. एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, तुम्हाला (सनातनला) होणारा विरोध हा विरोधी विचारांच्या लोकांकडून नाही, तर स्वकियांकडूनच म्हणजेच सर्वत्रच्या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडूनच होत आहे. सनातनचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे त्यांच्या कार्याला त्याचा शह बसत आहे. सनातन विविध पातळ्यांवर काम करत असून पुढे ते राजकीय क्षेत्रातही कार्य करू शकतात. त्यामुळे सनातनला ते विरोध करत आहेत.

२. अन्य एका राजकीय पक्षाच्या नेत्यानेही ‘सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी सर्वत्रच्या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना विशेष लक्ष देऊन प्रयत्नरत आहेत’, असे सांगितले.

सर्वत्रच्या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी विशेष सक्रीय असून साधकांनी अशा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यापासून सतर्कता बाळगावी. असे काही प्रसंग लक्षात आल्यास ते त्वरित आपल्या उत्तरदायी साधकांना कळवावेत.


Multi Language |Offline reading | PDF