छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानवध केला नाही, असा खोटा इतिहास पसरवणार्‍या अ‍ॅड्. धारवाडकर यांच्यावर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

सातारा – ‘भारतीय रक्षक आघाडी’चे अ‍ॅड्. धारवाडकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला नाही’, असे सांगत ‘शिवप्रतापदिना’ला विरोध केला, हे अत्यंत निषेधार्ह आहे. छत्रपतींंचा जागतिक स्तरावरील महापराक्रम नाकारून शिवद्रोह करणार्‍या धारवाडकरांनी शिवभक्तांची त्वरीत माफी मागावी. जातीयवाद पसरवणारे आता छत्रपतींचा पराक्रम पण नाकारत आहेत. काही वर्षांपासून छत्रपतींना हिंदुत्वापासून वेगळे करण्यासाठी, त्यांची तथाकथित पुरोगामी प्रतिमा निर्माण करण्यासाठी काही स्वयंघोषित इतिहास संशोधक खोटा इतिहास प्रसृत करत आहेत. अ‍ॅड्. धारवाडकर यांचे वक्तव्य याच शृंखलेतील एक भाग आहे. शिवप्रेमींनी कडाडून विरोध करून हा कुटील डाव हाणून पाडावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

‘शिवप्रतापदिन’ साजरा न करता ‘वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वधदिन’ म्हणून साजरा करण्याचे अ‍ॅड्. धारवाडकर यांचे वक्तव्य जातीय विद्वेषाला खतपाणी घालणारे असल्याने सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF