कर्नाटकमधील काँग्रेस सरकार १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती साजरी करणार !

हिंदूंच्या विरोधाकडे दुर्लक्ष !

  • एका दिवसात ५० सहस्रांहून अधिक हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान हा सुलतान नव्हे, तर सैतानच ! टिपूचे अस्तित्व कायमचे मिटवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • देशात हिंदूंचे तारणहार असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अफझलखानाचे पोट फाडत असल्याचे चित्र लावण्यावर बंदी घातली जाते, तर हिंदूंवर अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती सरकारी खर्चाने साजरी होते, हे भाजप सरकारला लज्जास्पद !
  • भाजप सरकार शबरीमला प्रकरणी हिंदूंवरील आघात रोखू शकले नाही कि गेल्या ४ वर्षांत टिपू सुलतानची जयंतीही साजरी करण्यापासून कर्नाटक सरकारला रोखले नाही ! मग भाजपला निवडून देऊन काय उपयोग, असे हिंदूंना वाटल्यास चूक काय ?

बेंगळूरू – कर्नाटकात येत्या १० नोव्हेंबर या दिवशी क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्याची घोषणा कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दल यांच्या आघाडी सरकाराने केली. (क्रूरकर्मा टिपू सुलतानचे वंशज असल्याप्रमाणे त्याची जयंती साजरी करणार्‍या काँग्रेस सरकारला मतपेटीद्वारे धडा शिकवण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – संपादक) राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने काँग्रेस आघाडी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला असून त्याविरुद्ध आंदोलन कारण्याची चेतावणी दिली आहे. याशिवाय ‘टिपू सुलतान जयंती विरोधी समिती’ने १० नोव्हेंबर या दिवशी राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

भाजपचे प्रवक्ते तेजस्वी सूर्य म्हणाले, ‘‘काँग्रेस आणि जनता दल यांचे आघाडी सरकार क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करून राज्यातील जनतेचे धार्मिक स्तरावर विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे गेल्या वर्षी सिद्धरामय्या यांनी टिपू सुलतानची जयंती साजरी केल्याने जनतेने त्यांना धडा शिकवत निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला, तीच वेळ आता विद्यमान मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर येणार आहे.’’

(म्हणे) ‘टिपू सुलतान हा क्रूरकर्मा नसून एक स्वातंत्र्य योद्धा होता, ही बाब राष्ट्रपतींनीही मान्य केली !’ – काँग्रेस आघाडी सरकार

काँग्रसे आघाडी सरकारचे म्हणणे आहे की, गेली ४ वर्षे सरकारी पातळीवर टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी ही प्रथा पालटण्याची आवश्यकता वाटत नाही. सरकार इतरही अनेक जणांची जयंती साजरी करते. मुख्य म्हणजे टिपू सुलतान हा क्रूरकर्मा नसून एक स्वातंत्र्ययोद्धा होता. एवढेच नव्हे, तर एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमातही टिपू सुलतानवर धडा आहे. मग त्याची जयंती साजरी करण्यात चूक काय ? (शासनकर्ते हिंदुद्वेषी आणि धर्मांधांचे लांगूलचालन करणारे असल्यामुळे हिंदूंचा नरसंहार करणार्‍या एका क्रूरकर्म्याचे विविध माध्यमांतून उदात्तीकरण केले जाते, हे अशा शासनकर्त्यांना सत्तेत बसवणारे सर्वत्रचे हिंदू आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना लज्जास्पद आहे ! – संपादक)

उच्च न्यायालयाने कर्नाटकमधील काँग्रेस आघाडी सरकारला १ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला !

गेल्या वर्षी कर्नाटकमधील काँग्रेस आघाडी सरकारने टिपू सुलतानची जयंती साजरी केल्याविरुद्ध कोडुगु जिल्ह्यातील श्री. मंजुनाथ यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यात न्यायालयाने काँग्रेस आघाडी सरकारला उत्तर देण्यासाठी वेळोवेळी अवधी वाढवून दिला होता. तरीही सरकारने त्यावर काहीच कारवाई न केल्याने उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला १ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.


Multi Language |Offline reading | PDF