‘चित्रलेखा’ या मराठी साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव, प्रकाशक आणि मुद्रक मित्रजित भट्टाचार्य, मालक ‘चित्रलेखा’ अन् अपकीर्तीकारक लेख लिहिणारे सचिन परब यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा प्रविष्ट !

फोंडा (गोवा) – ‘चित्रलेखा’ या मराठी साप्ताहिकात १४ मे ते २० मे २०१८ या अंकात पृष्ठ क्रमांक २४ ते २६ वर ‘मुखपृष्ठकथा’ या सदराच्या अंतर्गत ‘महाराष्ट्रातले आसाराम अजूनही मोकाट कसे ?,’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक लेख प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली होती. त्यामुळे सनातन संस्थेची अपरिमित हानी झाल्याने संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी ‘चित्रलेखा’ या मराठी साप्ताहिकाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात, तसेच अपकीर्तीकारक लेख लिहिणार्‍या लेखकाच्या विरोधात १० कोटी रुपये हानीभरपाई मागणीचा दिवाणी दावा येथील दिवाणी न्यायालयात प्रविष्ट केला आहे. सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत ३० मे २०१८ या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्याकडून मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी करण्यात आली होती; मात्र या मागणीची पूर्तता न झाल्याने श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते गजानन नाईक, नागेश ताकभाते, कु. दीपा तिवाडी, कु. अदिती पवार आणि रामदास केसरकर यांच्यामार्फत साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराव, प्रकाशक आणि मुद्रक मित्रजित भट्टाचार्य, मालक ‘चित्रलेखा’, तसेच लेखक सचिन परब यांच्या विरोधात मानहानी भरपाईचा दावा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF