सण साजरे करण्यामागील प्राचीन आर्यांचा मूळ उद्देश !

१. देवतांची कृपादृष्टी संपादन करणे
२. धर्मासाठी आणि समाजासाठी ज्यांनी जीवन वेचले, अशा संतमाहात्म्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेले ज्ञान यांचे सतत स्मरण ठेवणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
३. आपण ज्या धर्मात जन्म घेतला, त्या धर्माचे शिक्षण मिळवणे
४. ईश्‍वरोपासनेतून कुटुंबात सतत भक्तीभाव आणि धर्मनिष्ठा वृद्धिंगत करणे
५. दैनंदिन ठराविक चाकोरीबद्ध जीवनाला बाजूला सारून देवतांची पूजा, सेवा यांच्या माध्यमातून उच्च सांस्कृतिक जीवनाचा समन्वय साधणे
६. समाजातील प्रत्येकात असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळून व्यक्तीसह समाजजीवनही समृद्ध करणे
समाजातील धर्म कायम टिकवून संपूर्ण सृष्टीला सुखी करणे, हा उत्सव करण्यामागचा प्राचीन आर्यांचा मूळ उद्देश होता.


Multi Language |Offline reading | PDF