लोकहो, फटाके वाजवल्यामुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील दुष्परिणाम जाणा !

१. फटाक्यांच्या आवाजाने वाईट शक्ती जागृत होणे : ‘फटाके उडतांना कर्णकर्कश नादामुळे वातावरणातील वाईट शक्ती जागृत होऊन मानवाच्या नाशासाठी कारणीभूत होतात.
२. वाईट शक्तींनी आक्रमण करणे : ज्याच्याकडून फटाके उडवले जातात, त्याच्यावरच प्रथम त्या आक्रमण करतात, म्हणजेच त्या व्यक्तीला या जागृत झालेल्या वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो.
३. फटाक्याच्या धुरातील काळी शक्ती घेण्यासाठी वाईट शक्ती उपस्थित रहाणे : फटाक्यांच्या त्रासदायक धुरातून काळी शक्ती पसरत असल्याने ती घेण्यासाठी तेथे वाईट शक्ती सूक्ष्मातून उपस्थित रहातात. यामुळे घराच्या परिसरातील स्पंदनेही त्रासदायक होतात.
४. व्यक्ती दुर्धर आजाराला बळी पडणे : कालांतराने अनेक वर्षे एखाद्या परिसरात फटाके उडत असतील, तर तेथील व्यक्ती वाईट शक्तींच्या त्रासाने पीडीत होतात आणि कालांतराने दुर्धर आजारांना बळी पडतात.
५. फटाक्यांच्या विषारी धुरामुळे एखाद्या स्थानातील देवदेवतांना अथवा तपःश्‍चर्या करणार्‍या पुण्यात्मे तेथून निघून जाणे आणि त्यामुळे फटाके उडवणार्‍या व्यक्तीला पाप लागणे : फटाक्यांच्या आवाजामुळे, तसेच त्याच्या विषारी धुरामुळे एखाद्या स्थानात देवदेवतांचे वास्तव्य असल्यान त्यांना तेथून निघून जाणे भाग पडते. त्यांचा शापही फटाके उडवणार्‍यांना लागतो. कधी कधी पुण्यात्मे एखाद्या क्षेत्री सूक्ष्मातून तपःश्‍चर्या करत असतात. फटाके उडवल्याने वातावणातील चैतन्य उणावून  तपःसाधनेत व्यत्यय येतो. तेही व्यक्तीला शाप देऊन दुसरे स्थान शोधण्यासाठी निघून जातात.
दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी किंवा कोणत्याही सभा-समारंभात फटाके न उडवणेच अधिक इष्ट आहे.’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now