श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी नियमांचे उल्लंघन करणार्‍या राजकीय पक्षांवर कारवाई का केली नाही ? – उच्च न्यायालयाने पोलिसांकडे मागितले स्पष्टीकरण

नियमांचा भंग करून प्रतिदिन पहाटे दिल्या जाणार्‍या ‘बांगे’च्या आवाजामुळेही ध्वनीप्रदूषण होते, याविषयी याचिकाकर्त्यांचे काय म्हणणे आहे ?

मुंबई – श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटी येथे काही राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेली सार्वजनिक मंडळे रात्री १ वाजेपर्यंत पोलिसांच्या उपस्थितीत ध्वनीक्षेपक, ढोल, ताशे आणि बेंजो वाजवत होती; मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ‘संबंधित राजकीय पक्षांवर कारवाई का केली नाही?’, याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने पोलिसांकडे मागितले.

सणाच्या काळात ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने ठाणे येथील ‘आवाज फाऊंडेशन’चे सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर आणि आणखी काही नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केल्या आहेत. यांविषयी न्यायालयाने २ वर्षांपूर्वी ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात सविस्तर आदेश दिले आहेत. त्यांच्या पालनाचा आढावा न्यायालयाकडून घेण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF