सीबीआयचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना जामीन संमत

नवी देहली – लाचखोरीच्या आरोपावरून अटक झालेले सीबीआयचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना देहलीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३१ ऑक्टोबर या दिवशी जामीन संमत केला. ‘कुमार यांनी तक्रारदाराला वारंवार दूरभाष केले. या सूत्राव्यतिरिक्त कुमार यांच्या विरोधात कोणताही आरोप नाही. याशिवाय सीबीआयने कुमार यांच्या विरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यात त्यांनी लाच मागितल्याचा उल्लेखच नाही’, याकडे न्यायालयाने लक्ष वेधत त्यांना जामीन संमत केला. त्यांना जामीन संमत करतांना न्यायालयाने ‘अनुमतीशिवाय देश सोडून जाऊ नये’, अशी अट घातली आहे. कुमार यांच्याशी संबंधित गुन्ह्यातील कागदपत्रे यापूर्वीच जप्त करण्यात आली आहेत, असे सांगत सीबीआयनेही त्यांच्या जामिनास विरोध केला नाही.


Multi Language |Offline reading | PDF