पुणे विद्यापिठाचा भोंगळ कारभार !
नाशिक – येथे पुणे विद्यापिठाच्या ‘कामगार कायदा’ या विषयाची प्रश्नपत्रिका मिळण्यास अर्धा घंटा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रहावे लागले. ३१ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता ‘कामगार कायदा’ विषयाची परीक्षा होती; मात्र ऑनलाईन प्रश्नपत्रिका साडेदहा वाजूनही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे अन्य विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊनही संपूर्ण परीक्षा प्रक्रियेला विलंब झाला. असाच प्रकार नाशिकसह संगमनेर आणि अन्य परीक्षा केंद्रांवर झाल्याचे समजते.