घुसखोरांनी सैनिकांवर दगडफेक केली, तर त्यांना थेट गोळ्या घाला ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकी सैन्याला स्पष्ट आदेश

  • कुठे प्रतिदिन फुटीरतावादी देशद्रोह्यांकडून करण्यात येणार्‍या दगडफेकीत सैनिकांना मरू देणारे भारतीय शासनकर्ते, तर कुठे घुसखोर शरणार्थींना थेट गोळ्या घालण्याचा आदेश देणारे अमेरिकेचे कणखर शासनकर्ते  !
  • अशा कणखर भूमिकेमुळेच जगात अमेरिकेचा दबदबा आहे, याउलट भारतीय शासनकर्त्यांच्या कणाहीनतेमुळे ‘अणवस्त्रधारी’ देश असूनही पाक, बांगलादेश, चीन ही राष्ट्रे ऊठसूठ भारताच्या कुरापती काढत आहेत ! सरकार अमेरिकेकडून असा कणखरपणा कधी शिकणार ?
  • देशद्रोह्यांवर कारवाई करण्यासाठी कुठल्याही देशातील शासनकर्ते कधी मतपेटीचा विचार करत नाहीत, याउलट भारतीय शासनकर्ते मतपेटीसाठी स्वतःही काही करत नाहीत आणि इतरांनाही काही करू देत नाहीत ! यामुळे राष्ट्राची अपरिमित हानी होते ! ही हानी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

वॉशिंग्टन – अन्य देशांतील काही नागरिक मोठ्या संख्येने अवैधरित्या अमेरिकेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशांना सीमेवरच रोखा अन् त्यांना कारागृहात टाका. नंतर कुठल्याही परिस्थितीत त्यांची सुटका केली जाणार नाही. सीमेवर रोखतांना या जमावाने जर सैनिकांवर दगडफेक केली, तर त्यांना थेट गोळ्या घाला, असा स्पष्ट आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी सैन्याला दिला.

रोजगाराच्या शोधात अल् साल्वाडोर, होंडुरास आणि ग्वाटेमाला या लॅटीन अमेरिकी देशांतून अनुमाने १० सहस्र शरणार्थींचा जमाव अमेरिकेत घुसण्याच्या सिद्धतेत असून त्याने मॅक्सिकोची सीमा पार केली आहे.

ही सीमा पार करतांना या जमावाने तेथील सैनिकांवर जोरदार दगडफेक केली होती. या जमावाला अमेरिकेत घुसण्यापासून रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दक्षिण-पश्‍चिम सीमेवर अर्थात् अमेरिका आणि मॅक्सिको यांच्या सीमेवर तब्बल १५ सहस्र सैनिक तैनात केले आहेत. यामध्ये वायूसेनेचाही समावेश आहे.

ट्रम्प यांनी यापूर्वी अवैधरित्या आश्रय घेतलेल्या शरणार्थींवर कारवाई करण्याच्या अमेरिकेच्या धोरणात अमूलाग्र पालट केला. ते म्हणाले ‘‘अमेरिकेतील न्यायालयाने संबंधितांच्या शरण अर्जावर सुनावणी केल्यानंतरच त्यांना मुक्त करण्यात येईल. न्यायालयाचा निर्णय जर शरणाथींच्या बाजूने लागला नाही, तर त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल. शरणार्थींना ‘पकडा आणि सोडून द्या’, हे जगभर राबवण्यात येणारे धोरण हास्यास्पद आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF