रोहिंग्या मुसलमानांची आता कारगिल सीमेवरही घुसखोरी ! – गुप्तचर यंत्रणा

भारतातील ४० मुसलमान संघटना रोहिंग्यांसाठी कार्यरत असल्याची माहिती

  •  कुठे घुसखोरांविषयी कठोर भूमिका घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तर कुठे पुरोगामी आणि धर्मांध यांच्या दबावाला बळी पडून रोहिग्यांना हाकलू न शकणारे केंद्रातील भाजप सरकार !
  • देशाच्या मुळावर उठलेल्या घुसखोर रोहिंग्यांच्या, तसेच त्यांच्या देशद्रोही समर्थकांच्या वेळीच मुसक्या न आवळल्याचे फलित ! भाजप सरकारच्या रोहिंग्यांविषयीच्या बोटचेप्या भूमिकेमुळे एक दिवस भारतात हिंदूच अल्पसंख्य होतील ! हिंदूंनो, असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्र स्थापा !

नवी देहली – म्यानमारमधून हाकलून लावलेले रोहिंग्या मुसलमान मोठ्या प्रमाणावर भारतात घुसखोरी करत आहेत. त्यांतील बहुसंख्य बंगालमध्ये स्थायिक झाले असून इतर रोहिग्यांनी भारत-पाक सीमेवरील कारगिल या संवेदनशील भागातही घुसखोरी केल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. त्यामुळे सुरक्षायंत्रणेला सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

या माहितीनुसार कारगिल भागात सुमारे ५३ रोहिंग्या आढळून आले. त्यांतील बहुतेक रस्ते बांधणीच्या कार्यात कामगार म्हणून काम करत आहेत. त्यांना तेथे आणण्यामागे भारतातील अनुमाने ४० मुसलमान संघटना कार्यरत आहेत.

या संघटना रोहिंग्या मुसलमानांना बांगलादेश येथून भारतात येण्यास साहाय्य्य करण्यापासून त्यांच्यासाठी बंगाल राज्यात घरे बांधण्यापर्यंत त्यांना सर्वोतोपरी

साहाय्य करत आहेत. या संघटनांनी रोहिंग्यांना बांगलादेश, जम्मू, भाग्यनगर आणि इतर राज्यांतून बंगालमधील २४ परगणा या जिल्ह्यात येण्याचे आवाहन केले आहे. तेथे रोहिंग्या घुसखोरांसाठी घरे बांधण्यास लागणारी आवश्यक भूमी दान करण्याचे आवाहन स्थानिक मुसलमानांना करण्यात आले आहे. या रोहिंग्या मुसलमानांना भारताचे नागरिकत्व मिळवून देण्यासाठीही या संघटना प्रयत्नशील असल्याचे गुप्तहेर खात्याचे म्हणणे आहे. या ठिकाणी अनुमाने ५ सहस्र रोहिंग्यांना बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच संघटना बांगलादेशातील निर्वासित छावण्यांत रहाणार्‍या रोहिंग्यांना भारतात आणण्यात सक्रीय साहाय्य करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF