पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला २५ लक्ष रुपयांचा धनादेश

देवळांचा निधी हा केवळ धार्मिक कार्यासाठीच खर्च केला पाहिजे, हे सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या प्रशासनाच्या लक्षात येईल का ? देवनिधीचा अपव्यय टाळण्यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात देणे आवश्यक आहे !

कोल्हापूर, २ नोव्हेंबर (वार्ता.) – पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी २५ लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, बी.एन्. पाटील-मुगळीकर, सौ. संगीता खाडे, समितीचे सचिव विजय पोवार, साहाय्यक सचिव शिवाजीराव साळवी, मिलिंद घेवारी आदी उपस्थित होते. या वेळी समितीच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा आणि जोतिबा विकास आराखडा यांविषयी चर्चा केली. जोतिबा विकास आराखड्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित रहाण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.


Multi Language |Offline reading | PDF