काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

 

बडगाम मध्ये न्यूज एजेंसीच्या व्हॅन वर दगडफेक

श्रीनगर – बडगाममधील झागू अरिजल येथे भारतीय सैन्य आणि आतंकवादी यांच्यात १ नोव्हेंबरला पहाटे झालेल्या चकमकीत सैन्याने २ आतंकवाद्यांना ठार केले.

झागू अरिजल भागात आतंकवादी लपून बसले असल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. त्यानंतर या भागाला सैनिकांनी वेढा घातला. सैनिकांनी प्रथम आतंकवाद्यांना शरण येण्यास सांगितले; मात्र आतंकवाद्यांनी सैन्यावरच गोळीबार चालू केला. त्यानंतर सैन्याने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत २ आतंकवाद्यांना ठार केले. सैन्याने दिलेल्या माहितीनुसार हे आतंकवादी स्थानिकांना चिथावत होते, तसेच पंचायत निवडणुकांमध्ये अडथळे निर्माण करत होते. त्यांच्याकडून २ ‘एके-४७ रायफल’, तसेच १ बंदूक जप्त करण्यात आली आहे. सैन्याकडून या भागात शोधमोहीम राबवली जात आहे.

देशद्रोही धर्मांध महिलांकडून सैनिक आणि पत्रकार यांच्यावर दगडफेक

कुठे धर्मासाठी थेट रस्त्यावर उतरून दगड हाती घेणार्‍या मुसलमान महिला,तर कुठे ‘मी आणि माझे कुटुंब’ यांच्यात रममाण झालेल्या हिंदु महिला !

बडगाममधील झागू अरिजल भागात २ आतंकवाद्यांना ठार केल्यानंतर शोधमोहीम हाती घेतलेले सैनिक, तसेच तेथे वृत्तांकन करणारे पत्रकार यांच्यावर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. विशेष म्हणजे दगडफेक करणार्‍यांमध्ये देशद्रोही धर्मांध महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. या देशद्रोह्यांनी दगडफेक करत भारतविरोधी घोषणा दिल्या. याविषयीची चित्रफीत सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाली आहे.


Multi Language |Offline reading | PDF