न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत १ सहस्र वर्षांनंतरही राममंदिर होणार नाही ! – शिवसेनेचे खासदार संजय राऊत

केंद्रात बहुमतात असलेल्या भाजप सरकारला हिंदूबहुल देशात राममंदिरासाठी अध्यादेश का काढता येत नाही ?

मुंबई – श्री. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्याभेटीची सिद्धता पूर्ण झाली आहे. मोदी सरकारला राममंदिराच्या आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी हा दौरा आहे. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहात राहिलो, तर १ सहस्र वर्षे उलटून गेली, तरी राममंदिर होणार नाही, असे विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेशी बोलतांना केले. अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील वर्षीच्या जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. ‘राममंदिराच्या उभारणीसाठी आता केंद्र सरकारनेच भूमिका घ्यावी’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि संघटना यांच्याकडून होत आहे. ‘केंद्र सरकारने मंदिर उभारणीसाठी लवकरात लवकर कायदा करावा किंवा अध्यादेश काढावा’, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF