(म्हणे) ‘आरक्षणासाठी बलीदान देईन !’ – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार

  • बलीदान राष्ट्रासाठी देतात, हेही ज्ञात नसलेले मुख्यमंत्री होतात ! हेच लोकशाहीचे फलित म्हणायचे का ?
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देण्याची तरतूद केवळ १० वर्षांसाठी केली होती. आज ७० वर्षे उलटून गेली, तरी आरक्षण कायम राहिले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या भूमिकेतून आरक्षण संपवायला हवे !
  • कुठे संपूर्ण रयतेच्या हिताचा विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे समाजाच्या एका घटकाचा विचार करणारे स्वार्थी आणि जात्यंध सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी ?

पाटणा – अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे धारिष्ट्य कोणातही नाही. कुणी तसे करण्याचा प्रयत्न केल्यास प्रसंगी आरक्षणासाठी बलीदानही देईन, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले.

गया येथे जनता दल (संयुक्त)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘सामाजिक न्यायासह समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधण्यास आम्ही बांधील आहोत. काही लोकांना आरक्षणाच्या सूत्रावरून समाजात तणाव निर्माण करायचा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली.

(अर्धसत्य सांगणारे नितीशकुमार ! पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आरक्षण केवळ १० वर्षेच ठेवण्याविषयी सांगितले होते. तथापि स्वार्थी राजकारण्यांनी पुढे ६० वर्षे जगात कुठेही अस्तित्वात नसलेली आरक्षणपद्धत चालू ठेवली  ! हे पूर्णसत्य मुख्यमंत्री नितीशकुमार लपवून का ठेवतात ? – संपादक) ‘संविधान सभे’ने घटना स्वीकारली. आरक्षणच मिळाले नाही, तर वंचित घटकातील लोक मुख्य प्रवाहात कसे येतील ? मागासवर्गियांचा विकास झाला नाही, तर राज्य आणि देश यांचा विकासही होऊ शकत नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF