राहुल गांधी यांच्यादेखत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात खडाजंगी

आपल्या गटातील उमेदवारांना तिकीट मिळवून देण्याच्या चढाओढीवरून वाद !

  • पक्षातील नेत्यांमधील वादही सोडवू न शकणारे राहुल गांधी जनतेच्या समस्या कधीतरी सोडवू शकतील का ?
  • लहान मुलांप्रमाणे भांडणारे काँग्रेसचे नेते राज्य करण्याच्या लायकीचे आहेत का ?

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडलेल्या उमेदवारांच्या सूचीला अंतिम रूप देण्यासाठी ३१ ऑक्टोबरला रात्री झालेल्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यादेखत पक्षाचे नेते दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात खडाजंगी झाली. आपल्या गटातील उमेदवारांना तिकीट मिळवून देण्याच्या चढाओढीवरून हा वाद झाला. शेवटी हा वाद निस्तरण्यासाठी राहुल गांधी यांना अशोक गहलोत, वीरप्पा मोईली आणि अहमद पटेल यांची त्रिसदस्यीय समिती नेमावी लागली. या समितीने रात्री उशिरा बैठक घेऊन वाद सोडवण्यासाठी प्रयत्न चालू केले.


Multi Language |Offline reading | PDF