बेळगाव येथे २ दिवसीय कार्यशाळेतून धर्मप्रेमींचा कृतीशील होण्याचा निर्धार !

कार्यशाळेत सहभागी झालेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ

बेळगाव – येथे २७ आणि २८ ऑक्टोबर या दिवशी २९ धर्मप्रेमींची कार्यशाळा उत्साहात पार पडली. ५ धर्मप्रेमींनी पूर्णवेळ सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. धर्मप्रेमींनी लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर, मंदिर सरकारीकरण, धर्मशिक्षण आणि साधना यांची आवश्यकता, देवतांचे विडंबन रोखणे हे विषय मांडले. समितीच्या समन्वयकांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. सनातनच्या सौ. उज्ज्वला गावडे आणि डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी ‘साधना’ हा विषय मांडला. अनिष्ट शक्तींपासून होणारे त्रास आणि त्यावर उपाययोजना याविषयी उपस्थित धर्मप्रेमींना अवगत केले. सांगली जिल्ह्यातील समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी ‘सुराज्य अभियान’ हा विषय मांडला. कर्नाटक राज्य प्रसारसेवक श्री. काशिनाथ प्रभू यांनी ‘साधनेचे महत्त्व, सध्याची स्थिती, येणारा आपत्काल’ हा विषय मांडून कार्यशाळेचा समारोप केला.

धर्मप्रेमींचे वैशिष्ट्यपूर्ण मनोगत

१. श्री. पुंडलिक अल्लोळकर – ‘कार्यशाळेला आलेले सर्व साधक हेच माझे खरे कुटुंब आहे’, असे वाटत आहे. त्यामुळे घरची आठवण येत नाही आणि येथून जावेसे वाटत नाही. दिवसभर शिबिरात थकवा जाणवला नाही. या वास्तूमध्ये कार्यशाळा झाल्यामुळे ‘ही वास्तू आता आश्रम झाली आहे’, असे वाटते.

२. श्री. सुनील नंदगडकर – शिबिराला येण्याआधी पुष्कळ अडथळे आले; मात्र येथे आल्यापासून पुष्कळ आनंद जाणवला. मला कुठेही आणि कधीही सेवेसावाठी बोलवा.

३. श्री. योगेश पाटील – येथील शिस्त, प्रेम, बोलण्याची पद्धत हे सगळे पाहून चांगले वाटले.

४. श्री. श्रीपाद देशपांडे – प्रत्येकाने पुढच्या वेळी आणखी २५ जणांना आणायचे आहे. हे धर्मकार्य गल्लीबोळापर्यंत आपण पोहोचवायचे आहे.


Multi Language |Offline reading | PDF