१९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन !

कालावधी वाढवण्याची विरोधी पक्षांची मागणी

मुंबई – राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून चालू होणार असून ते ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. २ आठवड्यांच्या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस फक्त ९ दिवस असतील. त्याच कालावधीत येणार्‍या गुरुनानक जयंतीच्या दिवशीही अधिवेशन चालू रहाणार आहे. आज विधानमंडळात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.

१. सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने अधिवेशनाचा कालावधी आणखी वाढवावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. आज सकाळी विधानमंडळ विधानसभा समितीच्या बैठकीत कामकाज सल्लागार समितीचे सर्व प्रमुख, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, विधानसभा, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते आदी उपस्थित होते.

२. अधिवेशनात दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, तसेच १६ हून अधिक मंत्र्यांवरील होणारे भ्रष्टाचाराचे आरोप तसेच जलयुक्त शिवार योजनेतील झालेले सरकारचे अपयश आदी महत्त्वाच्या विषयांवरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF