बोट दुर्घटनेनंतर शिवस्मारकाची जागा पालटण्याची मागणी अयोग्य ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

मुंबई – बोट दुर्घटनेनंतर शिवस्मारकाची जागा पालटावी, अशी मागणी होत आहे. ती अत्यंत अयोग्य आहे. शिवस्मारक अरबी समुद्रातच नियोजित जागेवरच उभारले जाईल. जलपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला होता. त्यानंतर  यंत्रसामुग्रीची पूजा करण्याचा सरकारी कार्यक्रम होता; मात्र दुर्दैवाने तो अपघात घडला. २४ ऑक्टोबरला एकूण ४ बोटी पायाभरणीच्या निमित्ताने होणार्‍या पूजेसाठी या ठिकाणी निघाल्या होत्या. त्यापैकी एक बोट जवळच्या मार्गाने (शॉर्टकटने) दीपस्तंभाच्या बाजूने गेली, तेथे खडक आहेत. त्यामुळे हा अपघात घडला असावा, हा प्राथमिक तर्क आहे. जे झाले ते दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्गांची निर्मिती केली. ते जलदुर्ग अशा ठिकाणी आहेत, जे त्या काळात उभारण्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. अशा महाराजांचे स्मारक अरबी समुद्रातच झाले पाहिजे आणि ते होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now