काश्मीरमध्ये चकमकीत २ आतंकवादी ठार

आतंकवादग्रस्त भारत !

श्रीनगर – पूलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सुरक्षा सैनिक आणि आतंकवादी यांच्यात ३० ऑक्टोबरला दिवसभर चाललेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात सैनिकांना यश आले. हे दोघेही जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचे सदस्य होते. घटनास्थळी सैनिकांना ‘एम्-४’ बनावटीची अद्ययावत ‘स्नायपर’ रायफल सापडली आहे. लांब पल्ल्यावरून शत्रूला टिपण्यासाठी अमेरिकेचे मरिन कमांडो ही रायफल वापरत असल्याचे सांगण्यात आले. (आतंकवादी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. यावरून भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण किती आवश्यक आहे, हे दिसून येते ! – संपादक)

त्रालमधील चानकेतार गावात आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सकाळी सैनिकांनी या भागाला वेढा घातला. या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर आक्रमण केले. त्यास सैनिकांनीही चोख प्रत्युत्तर दिले. ही चकमक दिवसभर चालू होती. सायंकाळी आतंकवाद्यांना ठार करण्यात सैन्याला यश आले. या कारवाईत आतंकवादी लपून बसलेले घरच सैन्याने जमीनदोस्त केले. गेल्या आठवड्यात त्रालमध्ये आतंकवाद्यांनी अशाच पद्धतीने केलेल्या आक्रमणात २ भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF