(म्हणे) ‘मी हिंदूवादी नव्हे, तर राष्ट्रवादी नेता आहे !’ – राहुल गांधी

देशाची फाळणी, आणीबाणी, शीख दंगल, काश्मिरी हिंदूंचे विस्थापन, राष्ट्राची प्रतिमा मलीन करणारे लाखो-कोटी रुपयांचे घोटाळे, या सर्व राष्ट्रविरोधी गोष्टींना उत्तरदायी असणार्‍या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी स्वतःला ‘राष्ट्रवादी’ म्हणावे, यासारखा विरोधाभास तो कोणता ?

इंदूर (मध्यप्रदेश) – मी हिंदूवादी नेता नव्हे, तर राष्ट्रवादी नेता आहे. मी सर्व धर्मियांचा नेता आहे. मंदिरात जाण्यासाठी मला भाजपच्या प्रशस्तीपत्रकाची आवश्यकता नाही. हिंदु धर्म मला त्यांच्यापेक्षा अधिक समजतो. त्यामुळे भाजपने मला हिंदु धर्म शिकवू नये, अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली.

राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून मंदिरांत जात असल्याच्या सूत्रावरून भाजपने ‘काँग्रेस हा मुसलमानांचा पक्ष असून काँग्रेसला हा डाग पुसण्यासाठी राहुल  गांधी यांनी हिंदुत्वाचे प्रदर्शन चालू केले आहे’, असा आरोप केला होता. त्यास गांधी यांनी वरील प्रत्युत्तर दिले.


Multi Language |Offline reading | PDF