इंग्लंडच्या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाकडून बिअरचे ‘गणेश’ असे नामकरण

हिंदूंच्या विरोधानंतर आस्थापनाने मागितली क्षमा !

विदेशात हिंदूंच्या देवतांच्या अवमानाविषयी जागृत असलेल्या हिंदूंचे अभिनंदन ! भारतातील हिंदूंनी यातून बोध घेऊन देशात होत असलेल्या विडंबनाच्या घटना वैध मार्गाने रोखण्यास कृतीशील झाले पाहिजे !

लंडन – इंग्लंडमधील ‘विशबोन ब्रूअरी लिमिटेड’ या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाने मॅनचेस्टरमध्ये आयोजित केलेल्या बिअरच्या एका कार्यक्रमात भारतीय नागरिकांना आकर्षित करण्यासाठी फळे आणि भाज्या यांच्यापासून बनवलेल्या बिअरला ‘गणेश’, असे नाव दिले. त्यामुळे हिंदू संतप्त झालेे. याविषयी अमेरिकेतील ‘युनिव्हर्सल सोसायटी ऑफ हिंदूइझम’ या संस्थेचे अध्यक्ष राजन झेद आणि अन्य सदस्य यांनीही आक्षेप घेतला. अनेक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे लक्षात आल्यावर आस्थापनाचे मुख्य अड्रीयन चॅपमेन यांनी हिंदु नागरिकांची जाहीर क्षमा मागितली.


Multi Language |Offline reading | PDF