बुलढाणा येथे सुतळी बॉम्बचा स्फोट होऊन लहान मुलाचा मृत्यू

फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणासह होणारी जीवितहानीसुद्धा सरकार अन् न्यायालय यांनी लक्षात घेऊन ती रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना काढावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

बुलढाणा – पिंपळगाव सराई येथील यश गवते (वय ६ वर्षे) या मुलाचा सुतळी बॉम्बचा स्फोट होऊन मृत्यू झाला. ३० ऑक्टोबर या दिवशी घराबाहेर असलेल्या रेतीच्या ढिगार्‍यावर तो खेळत असतांना त्याच्याजवळ असलेल्या सुतळी बॉम्बचा अचानक स्फोट झाला. त्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दिवाळीतील फटाक्यांमुळे ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे गावात शोककळा पसरली.


Multi Language |Offline reading | PDF