हिंदुद्वेषी किरण गायकवाड यांच्याकडून फेसबूकवर अश्‍लाघ्य कविता लिहून हिंदु देवता आणि श्रद्धास्थाने यांचा घोर अवमान !

राष्ट्रीय वारकरी सेनेकडून नागपूर आणि नगर येथे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

शासनाने आंदोलन करण्यास भाग पाडू नये ! – राष्ट्रीय वारकरी सेनेची चेतावणी

धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने लिखाण करणार्‍या या विकृत ‘कवी’वर सायबर पोलिसांच्या वतीने स्वतःहून कारवाई का करण्यात आली नाही ? जागरूक हिंदूंना कारवाई करण्याची मागणी करावी लागणे, हेच दुर्दैवी !

नेवासा येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देतांना वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – ‘फेसबूक’ या सामाजिक प्रसारमाध्यमावरून हिंदु धर्म, देवता आणि बोधचिन्ह यांवर कविता अन् विकृत विचारांद्वारे अश्‍लील अन् अतिशय खालच्या पातळीवर हिंदूंच्या भावना दुखावणारे द्वेषपूर्ण लिखाण स्वतःला ‘विद्रोही कवी’ म्हणवणारे किरण विजय गायकवाड (रहाणार शिर्डी, जिल्हा नगर) यांनी केलेे आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रीय वारकरी सेनेच्या वतीने काटोल (जिल्हा नागपूर) आणि नेवासा (जिल्हा नगर) येथील पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे.

राष्ट्रीय वारकरी सेनेच्या वतीने ह.भ.प. रमेश महाराज जाधव यांनी वाळूज पोलीस ठाणे, संभाजीनगर येथे तक्रार दिली आहे, तर नेवासा येथे राष्ट्रीय वारकरी सेनेचे श्री अमृतानंद महाराज कांकरिया, तसेच श्री. संतोष भाऊ पंधुरे, संतोष भाऊ कुटे, संदीप महाराज जाधव, तुषार करंडे, शुभम गव्हाणे, स्वप्नील भाऊ मापारी, सोमनाथ गायकवाड, नाणेकर सर, दत्तात्रय महाराज बहिरट या हिंदुत्वनिष्ठांनी मिळून तक्रार दिली आहे.

(टीप – कवितेतील ओळी पुष्कळ अश्‍लील असल्याने त्या येथे प्रसिद्ध करू शकत नाही.)

हिंदु धर्म आणि देवता यांच्याविरुद्ध असभ्य भाषेत लिखाण करणार्‍या विद्रोही ‘कवी’वर कारवाई करावी ! – राष्ट्रीय वारकरी सेना

या प्रकरणाविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी सांगितले की, सामाजिक माध्यमांतून देव-धर्माचे, साधू-संतांचे विडंबन चालू असून काही विघातक शक्ती यामागे आहेत. अनेक ठिकाणी तक्रारी प्रविष्ट होत आहेत; मात्र प्रशासकीय यंत्रणा कुणालाही अटक करतांना दिसत नाही. अशा विकृत शक्तींना जाणूनबुजून राजकारणासाठी मोकाट सोडण्यात येत आहे, असा वारकरी संप्रदायाचा स्पष्ट आरोप आहे. जर सरकारने वेळीच पाऊल उचलले नाही, तर वारकर्‍यांना आंदोलन करणे भाग पडेल आणि हे हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या युतीच्या शासनाला शोभणारे नाही, असे सर्व कीर्तन, प्रवचनकार आणि कथाकार यांच्या मनामध्ये येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF