(म्हणे) ‘फडणविसांना रामाचा अवतार जाहीर करा; आपसूकच रामराज्य अवतरेल !’ – राधाकृष्ण विखे-पाटील

स्वत:च्या शासनकाळात जनतेला रावणराज्याचा अनुभव देणार्‍या काँग्रेसला असे म्हणण्यास खरेतर लाज वाटली पाहिजे. घोटाळ्यांचे उच्चांक गाठल्यानेच जनतेनेच काँग्रेसला लाथाडले असल्याने ती राज्य करण्यास काय पक्ष म्हणून रहाण्यासही पात्र नाही.

जालना – मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेलेच आहे. आता फडणवीस हे रामाचा अवतार असल्याचे जाहीर करून टाका. म्हणजे महाराष्ट्रात आपसूकच ‘रामराज्य’ अवतरेल, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जालना येथील जाहीर सभेत ते बोलत होते. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत सुराज्य यात्रा काढली आहे. यावरून विखे-पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF