एन्.आय.ए.कडून साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह ७ जणांवर आरोप निश्‍चित

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण

मुंबई – वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर उपाध्याय यांच्यासह ७ जणांवर आतंकवादी कट आणि हत्येचा ठपका ठेवून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने आरोप निश्‍चित केले. या प्रकरणी पुढील सुनावणी २ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. या सर्वांना आतंकवादाचा कट रचणे, हत्या करणे आणि अन्य कलमांच्या अंतर्गत (यू.ए.पी.ए. नुसार) अटक करण्यात आली होती. कर्नल पुरोहित यांनी या कलमांच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती आणि या याचिकेवर अंतिम निर्णय होइपर्यंत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयातील सुनावणी थांबवावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; मात्र ती अमान्य करण्यात आली.

आम्ही राष्ट्रवादी आहोत, आतंकवादी नाही ! – साध्वी प्रज्ञासिंह

आमच्याच देशात आम्ही आतंकवाद कसा पसरवू शकतो ? आम्ही राष्ट्रवादी आहोत, आतंकवादी नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी (यू.पी.ए.) सरकारने आम्हाला अडकवले असून ‘अभिनव भारत’वरचे सगळे आरोपही खोटे आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now