राजदचा माजी खासदार महंमद शहाबुद्दीन याची जन्मठेप कायम

दोन भावांना अ‍ॅसिडमध्ये बुडवून मारल्याचे प्रकरण

अशा क्रूर गुंडांना खासदार बनू देणारी लोकशाही निरर्थकच नव्हे, तर ‘समाजव्यवस्थेच्या मुळावर उठणारी’, असेच म्हणावे लागेल ! लोकहो, आता तरी हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

सिवान – बिहारमधील सिवान येथे वर्ष २००४ मध्ये दोन भावांना अ‍ॅसिडमध्ये बुडवून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार आणि नामचीन गुंड महंमद शहाबुद्दीन याला देण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. पाटणा उच्च न्यायालयाने शहाबुद्दीन याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते; तथापि सर्वोच्च न्यायालयाने शहाबुद्दीन याची याचिका फेटाळून लावत पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

सुनावणीच्या काळात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपिठाने शहाबुद्दीनच्या अधिवक्त्यांना ‘दुहेरी हत्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी न्यायालयात जात असतांनाच राजीव आणि रोशन यांची हत्या का आणि कशी झाली ?’, ‘या हत्येमागे कोणाचा हात होता ?’, असे काही प्रश्‍न विचारले. याशिवाय ‘पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नाही’, असे स्पष्ट केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now