छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा, तर दूरदर्शन वाहिनीच्या छायाचित्रकाराचा मृत्यू

  • नक्षलवादाच्या उच्चाटनासाठी कोट्यवधी रुपये व्यय करूनही आतापर्यंत एकाही शासनकर्त्याला त्याचा बीमोड करता आलेला नाही, हे लज्जास्पद आहे ! यास्तव हिंदु राष्ट्रच हवे !
  • नक्षलवादाचा बीमोड करण्यास आतापर्यंतचे शासनकर्ते अपयशी ठरले आहेत, याचाच अर्थ ते सक्षम नाहीत ! अशांच्या हाती आणखी किती दिवस राज्य सोपवून जनतेच्या जिवाशी खेळत रहाणार ? लोकशाहीचे हे दारूण अपयशच होय ! हिंदूंना सुरक्षित जीवन जगता येण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • एरव्ही कावकाव करणारे पुरो(अधो)गामी नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणाविषयी चकार शब्दही का काढत नाही ? कि त्यांचे नक्षलींना समर्थन आहे ?

दंतेवाडा – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा झाले, तर दूरदर्शन वाहिनीच्या एका छायाचित्रकाराचा मृत्यू झाला. विधानसभेची निवडणूक तोंडावर असतांना नक्षलवाद्यांनी दंतेवाडाच्या अरनपूर भागात दूरदर्शन वाहिनीच्या चमूवर आक्रमण केले. हा चमू परतीच्या मार्गावर असतांना झाडीत दबा धरून बसलेल्या नक्षलींनी अचानक त्यांच्यावर आक्रमण केले. नक्षलींच्या आक्रमणाला पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. तथापि यात २ पोलीस हुतात्मा झाले, तर  साहु नावाच्या छायाचित्रकाराचा मृत्यू झाला. याशिवाय अन्य २ जण घायाळ झाले आहेत.

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातही २७ ऑक्टोबरला नक्षलवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक हुतात्मा झाले होते. नक्षलवाद्यांच्या या आक्रमणांमुळे दंतेवाडा, तसेच विजापूर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीचे दिवस असतांना नक्षलवाद्यांनी चालू केलेल्या या कारवायांमुळे प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत. दूरदर्शनचा चमू या भागात नेमका कशासाठी गेला होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भाजपच्या विरोधात भित्तीपत्रके लावली !

निवडणुकाही भयमुक्त वातावरणात घेऊ न शकणारा जगातील एकमेव देश भारत !

छत्तीसगड – विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात नक्षलवादीही डोके वर काढू लागले आहेत. बस्तर परिसरात नक्षलवाद्यांनी भित्तीपत्रके लावली आहेत. बैठकीच्या माध्यमातून ते सत्ताधारी भाजपवर बहिष्कार टाकण्यास सांगत आहेत. दुर्गम भागात अनेक भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यामध्ये ‘देशी-विदेशी ‘कॉर्पोरेट’ घराणे आणि ब्राह्मण, हिंदुत्व ‘फॅसिस्ट’ भाजपला पळवून लावा ! मत मागणार्‍या इतर पक्षांना लोक न्यायालयात उभे करा’, असे एका भित्तीपत्रकावर लिहिले आहे. (नक्षलसमर्थक, पुरोगामी, निधर्मीवादी आदींची भाषा, तसेच नक्षलवाद्यांनी वापरलेली भाषा समान आहे, हे लक्षात घ्या ! यावरून भारतात नक्षलवाद्यांना कोणाचे समर्थन आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक) दुसर्‍या भित्तीपत्रकात ‘बनावट छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घाला’, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘जे ग्रामस्थ मतदान करून येतील, त्यांचे हात कापले जातील’, अशी धमकीच नक्षलवाद्यांनी दिल्याची चर्चा आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात भित्तीपत्रके जप्त करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. नक्षलवादी हिंसक कारवाया करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF