हिंदु जनजागृती समितीच्या ठाणे जिल्ह्यातील सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या धर्मकार्यामधील धर्मप्रेमींचा सहभाग !

१. गणेशोत्सव प्रबोधन मोहीम

अ. ‘ठाणे जिल्ह्यात गणेशोत्सव प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत भिवंडी शहरात ६ धर्मप्रेमींनी भित्तीपत्रके लावली. उल्हासनगर येथील श्री. अनिल जयस्वाल यांनी त्यांच्या इमारतीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धर्मशिक्षण देणार्‍या फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यासाठी आणि प्रवचनाचे आयोजन करण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांची भेट घालून दिली. त्यानुसार गणेशचतुर्थीच्या सातव्या दिवशी तेथे प्रवचन करण्यात आले. प्रवचनाच्या दिवशी श्री. अनिल जयस्वाल यांनी संपूर्ण इमारतीमध्ये स्वतःहून प्रसार केला. गणेशचतुर्थीच्या दुसर्‍याच दिवशी त्यांनी १० फ्लेक्स मंडपात लावले आणि सात दिवसांनी हे फ्लेक्स काढून नंतर दुसर्‍या मंडळात लावण्यासाठी दिले. त्यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात प्रवचन करण्याची मागणी केली.

आ. जिल्ह्यात ५० गणेशोत्सव मंडळांना संपर्क करण्यात आले. यांतील ५ ठिकाणी प्रवचने करण्यात आली. एका मंडळात ‘क्रांतीगाथा’ हे फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. या सेवेत १२ धर्मप्रेमींनी सहभाग घेतला होता.

२. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या निमित्त भिवंडी शहरातील धर्मप्रेमींनी ७ मंडळांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले.’

– श्री. बळवंत पाठक, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, ठाणे आणि रायगड. (ऑक्टोबर २०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now