गुंतवणुकीसाठी भारत हा उत्तम देश ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा

टोकियो – उद्योजकांना गुंतवणूक करायची असेल, तर भारत हा एक उत्तम देश आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौर्‍यावर असून त्यांनी नुकताच जपानमध्ये रहाणार्‍या भारतीय लोकांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘सध्याच्या घडीला भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. ‘बुलेट ट्रेन’, ‘स्मार्ट सिटी’, ‘न्यू इंडिया’ ही भारताच्या विकासाची पावले आहेत. ‘न्यू इंडिया’ अर्थात् ‘नव भारत’ घडवायचा असेल, तर मला तुमच्या सर्वांचे सहकार्य हवे आहे. (भारताचा उत्कर्ष साधायचा असेल आणि भारत पुन्हा विश्‍वगुरु व्हायचा असेल, तर समाजाला साधना शिकवण्याशिवाय पर्याय नाही, हेच सत्य आहे ! भारतीय शासनकर्ते हे जाणतील, तो सुदिन ! – संपादक) भारतात दर्जेदार उत्पादने सिद्ध होतात.


Multi Language |Offline reading | PDF