फटाके फोडण्यासाठी २ घंटे कुठले असावेत, हे ठरवण्याची राज्यांना मुभा !

‘हरित’ फटाके फोडण्याची सक्ती केवळ देहलीपुरतीच असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा

फटाक्यांमुळे समाज आणि राष्ट्र यांचे कुठले हित साधले जाते ? उलट ते सर्वार्थाने विनाशकारीच आहेत ! त्यामुळे फटाक्यांवर बंदीच घातली पाहिजे !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ निश्‍चित केली होती; मात्र न्यायालयाने आता यात पालट केला असून फटाके फोडण्यासाठीचे २ घंटे कुठले वापरायचे, ते ठरवण्याची मुभा राज्यांना दिली आहे. तथापि ‘कालावधी मात्र दिवसातून २ घंट्यांहून अधिक नसेल’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

तमिळनाडू, पुद्दुचेरी यांसारख्या ठिकाणी सकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याने तमिळनाडू सरकारने फटाके रात्री ८ ते रात्री १० वाजेपर्यंत फोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार करण्याविषयी याचिका प्रविष्ट केली होती. यात तमिळनाडू सरकारने ‘रात्री ८ ते १० या वेळेशिवाय पहाटे ४.३० ते ६.३० या कलावधीतही फटाके फोडण्याची अनुमतीही द्यावी’, अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने ‘जर राज्यांना हवे असेल, तर ते २ घंट्यांचा अवधी सकाळी १ घंटा आणि सायंकाळी १ घंटा, असा विभागू शकततात’, असे सांगितले. याशिवाय ‘हरित फटाक्यां’चा (पर्यावरणपूरक फटाके) वापर करण्याचा आदेश केवळ देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र यांसाठीच होता’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now