देशभरातील चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक अत्याचार बोकाळल्याने त्यांच्या चौकशीसाठी विशेष आयोग नेमावा ! – लहू खामणकर, हिंदु जनजागृती समिती

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

  • स्वाक्षरी मोहिमेत १०० जणांचा सहभाग

  • राष्ट्र-धर्म विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन

आंदोलन करतांना राष्ट्राभिमानी

वणी, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – देशभरातील चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक अत्याचार बोकाळल्याने त्यांच्या चौकशीसाठी विशेष आयोग नेमावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. लहू खामणकर यांनी केली. येथील तहसील चौक येथे २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. देशभरातील सर्व चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करा, मुसलमानांसाठी बक्षीसपात्र मालमत्तेसाठी नोंदणी न करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, प्रयाग कुंभमेळ्यासाठी रेल्वेने येणार्‍या भाविकांवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त अधिभार लावण्याचा घेतलेला निर्णय हिंदूंवर अन्याय करणारा असल्याने तो त्वरित रहित करावा, ‘ऑनलाइन’ वेश्या व्यवसाय चालवणार्‍या संकेतस्थळांवर बंदी आणावी, तसेच कर्नाटक येथील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्‍या अबिद पाशा आणि त्याच्या टोळीवर ‘कोका’द्वारे कारवाई करून ही टोळी चालवणार्‍या ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर त्वरित बंदी आणावी अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.

आंदोलनात समितीच्या वतीने सौ. अरुणा ठाकरे, श्री. लोभेश्‍वर टोंगे, श्री. लहू खामणकर यांनी राष्ट्र-धर्म विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आंदोलनात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही सहभाग घेतला. विषय ऐकून १०० जणांनी स्वाक्षरीद्वारे आंदोलनात सहभाग घेतला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now