राज्यात २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह !

असे सप्ताह राबवण्याच्या जोडीला लाच घेणारे, तसेच भ्रष्टाचार करणारे यांना कठोरात कठोर शासन झाल्यासच अशा घटनांना आळा बसेल !

ठाणे – राज्यात यावर्षी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था आणि स्वायत्त संस्था, तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात याविषयी जनजागृती करायची ठरवली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग डॉ. महेश पाटील यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF